मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी
By Admin | Updated: August 22, 2016 23:53 IST2016-08-22T23:33:48+5:302016-08-22T23:53:15+5:30
सिन्नर : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भावरचंद्र गेहलोत व राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी
सिन्नर : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भावरचंद्र गेहलोत व राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात आले.
छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, योगेश केदारे, माधव आरवगडे, विजय गंधाके, भाऊसाहेब सोनवणे, सुनील शिंदे यांच्यासह पदाधिकार्यांनी मंत्रीद्वयींची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.