अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:31 IST2016-05-03T01:31:06+5:302016-05-03T01:31:06+5:30
दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात

अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी
- सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर
दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात पुढे आहे. परंतु संख्या कमी झाल्यास काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर परिणाम होणार आहे.
गेल्या दहा वर्षांतील आकड्यांवर नजर टाकली तर अमरनाथ यात्रा आजही काश्मीरच्या पर्यटनासाठी पाठीच्या कण्याइतकीच महत्वाची बनली असल्याचे दिसते. परंतु ही वस्तुस्थिती पर्यावरणाची पट्टी डोळ््यांवर बांधलेले फुटीरवादी नेते मान्य करायला तयार नाहीत. काश्मीरच्या पर्यटनाशी संबंधितांचे म्हणणे असे आहे की अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या पर्यटनाची जणू श्वास बनली आहे.
अशा पार्श्वभूमीवर अहसान फाजिलींसारख्या कितीतरी काश्मिरींना असे वाटते की ही यात्रा वर्षभर सुरू राहील अशी व्यवस्था झाली पाहिजे. ते फुटीरवाद्यांच्या मोहिमेशी सहमत नव्हते.
आकड्यांचा आधार घेत काश्मीरच्या पर्यटनाचा विचार केला तर गेल्या वर्षी काश्मीरला आलेल्या एकूण १५ लाख पर्यटकांमध्ये ३.७५ लाख अमरनाथ यात्रेकरू होते. २००४ पासून २००९ पर्यंत काश्मीरमध्ये
51,00,000
पर्यटक आले. त्यातील २१.३८ लाख पर्यटक अमरनाथ यात्रेकरू होते. हे यात्रेकरू पर्यटक म्हणूनही काश्मीरमध्येही फिरले होते.
संख्येवर आक्षेप का?
- यात्रा लांबविल्यामुळे पहाडी भागात प्रदूषण वाढत आहे.लिद्दर दरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.
- बैसरन तथा सरबलचे जंगल अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. पहाड आणि वाहत्या दऱ्यांचा समतोल व पर्यावरण व्यवस्था बिघडली आहे.
- यात्रेत अधिक संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देऊन आर्थिकदृष्ट्या काही संघटना बळकट होत आहेत.
- या संस्था पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी काहीही करीत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.