शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनची मागणी केवळ ६० मेट्रिक टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:05 IST

झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांसाठी मागील महिना काळ ठरला होता. चारही बाजूंनी संकट ओढावलेल्या या काळात हतबल आणि निराश झालेल्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले होते. महिन्याभरानंतर आता परिस्थिती बदलली असून, ऑक्सिजनची मागणी ७५ मेट्रिक टनाने कमी झाली असून, आता दिवसाला केवळ ६० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज आहे. 

ठळक मुद्देमहिन्याभरापूर्वी होती १३५ मेट्रिक टनावर

नाशिक : झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांसाठी मागील महिना काळ ठरला होता. चारही बाजूंनी संकट ओढावलेल्या या काळात हतबल आणि निराश झालेल्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले होते. महिन्याभरानंतर आता परिस्थिती बदलली असून, ऑक्सिजनची मागणी ७५ मेट्रिक टनाने कमी झाली असून, आता दिवसाला केवळ ६० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज आहे. नाशिककरांसाठी मागील महिन्याचा काळ अत्यंत कठीण होता.  ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत नाशिक देशात प्रथम क्रमांकावर आल्याने यंत्रणेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली तर सर्वसामान्य नागरिकांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. मागील महिन्यात रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्ह्याची ऑक्सिजन गरज दिवसाला १३५ मेट्रिक टनावर पोहोचली होती. रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यातही जोखीम होती, शिवाय उपचारार्थ दाखल रुग्णांच्या जीविताचा धोका निर्माण झाला होता. या कठीण प्रसंगातून जिल्ह्याची सुटका झाली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.     आजच्या परिस्थितीत जिल्ह्याला ६० मेट्रिक टन इतक्याच ऑक्सिजनची गरज असून,  मागील महिन्याच्या तुलनेत ७५ मेट्रिक टनाने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. जिल्ह्यात बारा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास मोठी मदत झाली. राज्याचे निर्बंध अजूनही लागू असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे ऑक्सिजनचीदेखील मागणी कमी झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर कमीरुग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा  पाॅझिटिव्हिटीचा दरही दहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.  सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना ६० मेट्रिक टन इतकाच ऑक्सिजन लागत आहे, तर सध्या ८० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून, २० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कोरोना रुग्णांचा आलेख घटत असल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :NashikनाशिकOxygen Cylinderऑक्सिजन