नशिराबादला भिक मांगो राजकीय स्टंटबाजी
By Admin | Updated: March 29, 2016 00:24 IST2016-03-29T00:24:35+5:302016-03-29T00:24:35+5:30
नशिराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.

नशिराबादला भिक मांगो राजकीय स्टंटबाजी
न िराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.पत्रकात म्हटले आहे की, ग्रामपंचायत गावाची पाणी समस्या सोडविण्यात व्यस्त आहे. मुतारी बांधकाम ठराव ३ डिसेंबर २०१५ रोजी ठराव क्र.१२ नुसार झाला असून त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून मुतारी बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यात म्हटले असून पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे, सहकार्य करावे, अशी अपेक्षा सरपंचांनी व्यक्त केली आहे.