मयत कर्मचार्यांचे वारस पोहोचले महापालिकेत मागणी: सेवेत लवकरच सामावून घ्या...
By Admin | Updated: February 8, 2016 22:56 IST2016-02-08T22:56:02+5:302016-02-08T22:56:02+5:30
जळगाव : महापालिकेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी महापालिकेत येऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. यात महिला व मृतांच्या मुला-मुलांची समावेश होता.

मयत कर्मचार्यांचे वारस पोहोचले महापालिकेत मागणी: सेवेत लवकरच सामावून घ्या...
ज गाव : महापालिकेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी महापालिकेत येऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. यात महिला व मृतांच्या मुला-मुलांची समावेश होता. महापालिका सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या कर्मचार्यांना शासन धोरणानुसार सेवेत सामावून घेणे बंधनकारक असते. मात्र आतापर्यंत मयत ६० वारसांच्या मुला, मुलींना वा पत्नीस अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. याप्रश्नी संबंधित व्यक्तींकडून व्यक्तिगत पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्यात आला नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांनी सहा ते सात वर्षांपासून आपले अर्ज दिले असताना त्यांना नोकर्या मिळालेल्या नाहीत. किंवा त्यांच्या अर्जांची साधी दखलही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. वारस पोहोचले महापालिकेतमहापालिका कर्मचारी संघटनेचे अनिल नाटेकर व शिवराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांच्या विधवा, मुले-मुली सायंकाळी ५ वाजता महापालिकेत आले होते. आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनाबाहेर ही मंडळी बराच वेळ बसून होती. आयुक्त न आल्याने अखेर या वारसांनी आपला मोर्चा उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याकडे वळविला. प्रदीप जगताप यांना निवेदन देऊन अनुकंपा वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावेत अशी मागणी केली. याप्रश्नी आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे जगताप यांनी या कर्मचारी पाल्य व संघटना पदाधिकार्यांना दिले.