मटन विक्री दुकाने अन्यत्र हलविण्याची मागणी
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
कासारशिरसी : येथील बसस्थानक व पाणीपुरवठ्याच्या जलकुंभाजवळ मटण विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून, मांसाचे तुकडे रस्त्यावरच टाकली जात आहेत़ त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ही दुकाने अन्यत्र हलविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे़

मटन विक्री दुकाने अन्यत्र हलविण्याची मागणी
क सारशिरसी : येथील बसस्थानक व पाणीपुरवठ्याच्या जलकुंभाजवळ मटण विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून, मांसाचे तुकडे रस्त्यावरच टाकली जात आहेत़ त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ही दुकाने अन्यत्र हलविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे़कासारशिरशी येथील बसस्थानक व पाणीपुरवठ्याच्या जलकुंभाजवळ मटन दुकाने आहेत़ त्यामुळे दुर्गंधी पसरण्याबरोबच घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे़ परिणामी, डेंग्यूसारख्या आजाराची भिती व्यक्त होत आहे़ ग्रामपंचायतीने ही दुकाने त्वरित अन्यत्र हलवावीत अशी मागणी करण्यात आली आहे़ या मागणीचे निवेदन गुरुवारी ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे़ निवेदनावर शिवसेना शहराध्यक्ष जगन जगदाळे, बाबा बागवान, रफिक बागवान, मुस्तफा मुल्ला, अजीज शेख, यशवंत कदम, अवधूत पाठक, नवाज घाटे, धनराज होळकुंदे, शाबुद्दीन मंठाळे, नागेश नदीवाडे, मयूर गबुरे, किरण किवडे, यल्लप्पा सूर्यवंशी, संतोष तगरखेडे, ताजोद्दीन शेख, विवेक कोकणे, शफिक नरुणे, खासिम बागवान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.