चंत्रमागधारक संघटनांचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन प्रति मीटर ७ पैसे मजुरीवाढ करण्याची मागणी

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:39+5:302014-12-20T22:27:39+5:30

इचलकरंजी : गतवर्षीच्या महागाई निर्देशांकानुसार यंत्रमाग कामगारांना प्रती मीटर सात पैसे मजुरी वाढ देण्याची घोषणा सहाय्यक कामगार आयुक्तांनी करावी, अशा आशयाचे निवेदन शहरातील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी दिले. निवेदन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी स्वीकारले.

Demand for the Ministry of Labor Assistant to the Labor Commissioner to raise the demand of 7 paise per meter | चंत्रमागधारक संघटनांचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन प्रति मीटर ७ पैसे मजुरीवाढ करण्याची मागणी

चंत्रमागधारक संघटनांचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन प्रति मीटर ७ पैसे मजुरीवाढ करण्याची मागणी

लकरंजी : गतवर्षीच्या महागाई निर्देशांकानुसार यंत्रमाग कामगारांना प्रती मीटर सात पैसे मजुरी वाढ देण्याची घोषणा सहाय्यक कामगार आयुक्तांनी करावी, अशा आशयाचे निवेदन शहरातील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी दिले. निवेदन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी स्वीकारले.
२०१२मध्ये तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लवादाने यंत्रमाग कामगारांसाठी वार्षिक महागाई निर्देशांकावर आधारित मजुरी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक वर्षी मजुरीवाढीची घोषणा सहाय्यक कामगार आयुक्तांनी करावी, असे ठरले होते. त्याप्रमाणे मजुरीवाढीची घोषणा करावी आणि आठ तास काम द्यावे, अशी मागणी यंत्रमाग संघटनांच्या कृती समितीने केली. त्यास अनुसरुन सहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी यंत्रमागधारक संघटनांची बैठक आज, शनिवारी बोलावली होती.
आजच्या बैठकीस इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, यंत्रमागधारक जागृती संघटना, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन व पॉपलीन पॉवरलूम असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सहा. आयुक्त गुरव यांच्याशी झालेल्या चर्चेत सतिश कोष्टी, विनय महाजन, दीपक राशीनकर, सचिन डुक्कीरे, विश्वनाथ मेटे, चंद्रकांत पाटील, आदींनी भाग घेतला. दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मंजुरीच्या घोषणेकडे येथील यंत्रमागधारक व कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
------------------------

Web Title: Demand for the Ministry of Labor Assistant to the Labor Commissioner to raise the demand of 7 paise per meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.