हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:39+5:302014-12-20T22:27:39+5:30
नामपूर : मोसमप्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

हरणबारी धरणाचे आवर्तन जानेवारीत सोडण्याची मागणी नामपूरच्या शेतकर्यांचे जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदन
न मपूर : मोसमप्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाणी स्थिती बघता हे आवर्तन नोव्हेंबर ऐवजी ८ ते १० जानेवारीपर्यंत सोडावे अशा आशयाचे निवेदन येथील शेतकरी बिपीन सावंत, राजेंद्र सावंत यांनी जलसंपदा मंत्री यांचेकडे एका निवेदनातून केली आहे. या निवेदनाचा आशय असा अवकाळी पाऊस पडला. यामुळे पाणी पातळी स्थिर असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मक्याचा चारा शेतातच आहे. गव्हाची पेरणी लवकरच करावयाची आहे. मोसम नदीच्या पाण्याचे आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले तर त्या पाण्याचा फारसा फायदा शेतीला होणार नाही. गेल्या महिन्यात व या महिन्यात दोनवेळा जोराचा पाऊस झाला. जमिनीत आजच मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे. हरणबारीचे आवर्तन सोडले तर त्याचा फारसा फायदा शेतीस होणार नाही. म्हणून हे आवर्तन जर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत सोडल्यास त्याच पाण्याचा फायदा शेतीस चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.बेमोसमी पाऊस व गारपिट यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब पिक आता नामशेष होते की काय एवढी भयावह अवस्था डाळिंब पिकाची आहे. कांद्याचीसुद्धा हीच अवस्था आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणी नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. पाणी विकत घेऊनही पिकांचे उत्पन्न पुरेसे झाले नाही. यंदा किमान यानंतर तरी हरणबारीचे पाण्याचे आवर्तन नियोजनाने सोडले तर किमान उत्पादन खर्चावर आधारून तरी उत्पन्न मिळेल. (वार्ताहर)