ओतूर येथे स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:02+5:302015-02-14T23:51:02+5:30

ओतूर : शासनाने कळवण तालुक्यातील ओतूर येथे स्मशानभूमी शेड बांधावी अशी मागणी ओतूर ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

Demand for a graveyard shed at Otur | ओतूर येथे स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी

ओतूर येथे स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी

ूर : शासनाने कळवण तालुक्यातील ओतूर येथे स्मशानभूमी शेड बांधावी अशी मागणी ओतूर ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
गेल्या वीस वर्षापूर्वी ओतुर येथे स्मशानभूमीशेड बांधण्यात आले होते. परंतु सदर शेड पाचच वर्षात जमीनदोस्त झाले. त्याचे पत्रे अडवे असून फक्त सांगाडा उभा आहे. अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
फार पूर्वीपासून गावापासून मार्कनेच नदी तीरावर जावली झिरा, येथे अंत्यविधी होत आहे. सदर अंतर गावापासून दूर आहे. उन्हाळ्यात मार्कने नदी कोरी पडत असल्याने पाणीही उपलब्ध नसते. ग्रामपंचायतीत सदर जागेवर पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरुन अत्यंविधी व दशक्रिया विधी कार्यक्रम व्यवस्थीत पार पडतील. शासनाने ओतूर येथील स्मशानभूमीत शेड बांधावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Demand for a graveyard shed at Otur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.