सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधी वाढवा केंद्राकडे मागणी : कांबळे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परिषदेत लक्ष वेधले
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:23+5:302015-02-18T23:54:23+5:30
नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधी वाढवा केंद्राकडे मागणी : कांबळे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परिषदेत लक्ष वेधले
न ी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्र्याच्या परिषदेत कांबळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वत: सफाई करून डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी राज्य सरकारांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, या कामात गुंतलेल्या लोकांच्या पुनर्वसनावर भर देण्याची सूचना गहलोत यांनी केली. महाराष्ट्रात संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कांबळे परिषदेत बोलताना दिली. या कामात स्वयंसेवी संघटनांची मदत महत्त्वपूर्ण ठरू शकते. राज्य स्तरावर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा, असेही या परिषदेत सुचविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री कृष्णलाल गुर्जर यांनीही परिषदेला संबोधित केले.