जम्मू काश्मीर सरकारची पूरपीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
जम्मू-जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मागील वर्षी आलेल्या पुरात सापडलेल्या पीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. एनडीआरएफअंतर्गत असलेला हा निधी केंद्राने तात्काळ द्यावा असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

जम्मू काश्मीर सरकारची पूरपीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी
ज ्मू-जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मागील वर्षी आलेल्या पुरात सापडलेल्या पीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. एनडीआरएफअंतर्गत असलेला हा निधी केंद्राने तात्काळ द्यावा असे त्यांनी पुढे म्हटले आहे. राज्य सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जावी असे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना म्हटले आहे. तसेच त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत असलेली ४४ कोटींची रक्कमही राज्याला देण्यात यावी असे म्हटले आहे. या संदर्भात राज्यपाल एक आठवड्यानंतर दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.