शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य करण्याची मागणी, आमदार राजू कागे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:18 IST

अथणी/शिरगुप्पी : उत्तर कर्नाटकसाठी वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्री ...

अथणी/शिरगुप्पी : उत्तर कर्नाटकसाठी वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून वेगळ्या उत्तर कर्नाटकची मागणी केली आहे.प्रादेशिक असमानतेवर तीव्र असंतोष व्यक्त करताना कागे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत उत्तर कर्नाटक दक्षिण कर्नाटकपेक्षा मागे आहे. दक्षिणेला दाखवलेली विशेष काळजी उत्तरेला का दाखवली जात नाही? प्रत्येकजण कर्नाटक राज्याचा मुलगा आहे. तरीही सावत्र आईची वृत्ती का? या भागातील काही कार्यकर्ते भेदभाव दूर करावा किंवा वेगळे उत्तर कर्नाटक निर्माण करावे, अशी मागणी करत आहेत.दिवंगत माजी मंत्री व हुक्केरीचे आमदार उमेश कट्टी यांनीही या मुद्द्यावर आवाज उठवला होता. तसेच, उत्तर कर्नाटक विकास वेदिकेअंतर्गत अजूनही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आमदार राजू कागे यांनीही राज्य सरकारला वेगळे उत्तर कर्नाटक निर्माण करण्याची विनंती केली आहे. त्यांनी यासंदर्भात ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा विषय चर्चेचा बनला आहे.

पंधरा जिल्ह्यांच्या समावेशाची मागणी प्रशासकीय सोयीसाठी आणि व्यापक विकासासाठी, उत्तर कर्नाटकातील बिदर, कलबुर्गी, विजयपुरा, यादगीर, बागलकोट, बेळगाव, धारवाड, गडग, कोप्पल, रायचूर, उत्तर कन्नड, हवेरी, विजयनगर, बेल्लारी आणि दावणगेरे या १५ जिल्ह्यांचा समावेश असलेले एक नवीन राज्य स्थापन करावे, असे पत्रात म्हटले आहे.

पत्रात काय म्हटले आहे?कर्नाटकच्या एकीकरणापासून या प्रदेशाला सर्व क्षेत्रात सतत अन्याय, भेदभाव आणि सापत्न वागणूक मिळत आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीद्वारे आणखी एक कन्नडनाडू निर्माण होईल, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर कर्नाटक ही सर्व संसाधनांनी समृद्ध भूमी आहे. उत्तर कर्नाटक संघर्ष समिती (आर) जनप्रतिनिधी स्वाक्षरी संकलन मोहिमेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एक कोटीहून अधिक लोकांच्या स्वाक्षऱ्यांसह एक लेखी मत आधीच प्राप्त झाले आहे. राज्यपाल, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Demand for Separate North Karnataka State: MLA Raju Kage's Letter

Web Summary : MLA Raju Kage urges CM Siddaramaiah for a separate North Karnataka state, citing regional disparity and neglect. He highlights the persistent injustice and unequal treatment towards the region since Karnataka's unification, advocating for a new, resource-rich Kannada Nadu comprising 15 districts for better administration and development.