उमवितून कमी केलेल्या २४ कामगारांना कामावर घेण्याची मागणी
By admin | Updated: March 13, 2016 00:04 IST
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सबळ कारण नसताना २४ कंत्राटी कामगारांना ऑगस्ट २०१४ पासून कामावरून कमी केले आहे. हे कामगार मागासवर्गीय आहेत. म्हणून त्यांना कामावरून कमी केले काय, असा संशय भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहे. मजदूर संघाने विद्यापीठाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या. राज्यपाल यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना विद्यापीठाला दिली, पण या कामगारांना कामावर घेतले नाही.
उमवितून कमी केलेल्या २४ कामगारांना कामावर घेण्याची मागणी
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सबळ कारण नसताना २४ कंत्राटी कामगारांना ऑगस्ट २०१४ पासून कामावरून कमी केले आहे. हे कामगार मागासवर्गीय आहेत. म्हणून त्यांना कामावरून कमी केले काय, असा संशय भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहे. मजदूर संघाने विद्यापीठाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या. राज्यपाल यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना विद्यापीठाला दिली, पण या कामगारांना कामावर घेतले नाही. संबंधित कमी केलेले कामगार २००८ पासून विद्यापीठात विविध ठेकेदारांच्या माध्यमातून सफाईचे काम करीत होते. नंतर बीव्हीजी इंडियाकडे ऑगस्ट २०१४ पासून ठेका देण्यात आला. या कंपनीने संबंधित सफाई कामगारांना सबळ कारण न देता कमी केले. या कामगारांनी संघटना स्थापन करून कायद्यानुसार किमान वेतन, बोनस, भविष्य निर्वाह निधीची मागणी केली होती. आंदोलने केली म्हणून या कामगारांना कमी केले काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, सहायक कामगार आयुक्त यांनाही पत्र देऊन कार्यवाही करण्याचे आदेश राज्यपाल यांनी दिले. मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जे.पाटील, महामंत्री प्रभाकर बाणासुरे यांनी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ.अशोक महाजन, कायदा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना कामावर घेण्याची मागणी केली होती. कामगार चोर नाहीत. त्यांचा अधिकार त्यांना मिळावा, असे अधिकार्यांना लक्षात आणून दिले, पण अधिकार्यांनी कंत्राटदारांकडे बोट दाखविले. आजपर्यंत या कामगारांना कामावर घेतले नाही. यासंदर्भात राज्यपालन, शिक्षणमंत्री यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.