माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक घेण्याची मागणी
By Admin | Updated: March 18, 2015 23:24 IST2015-03-18T23:04:25+5:302015-03-18T23:24:28+5:30
शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक घेण्याची मागणी
शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन
नाशिक : नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याची मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची मागील पंचवार्षिक निवडणूक २००९-१० या काळात झाली होती. त्यामुळे या संचालक मंडळाची मुदत ११ मे २०१५ रोजी संपत असून, याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम लावलेला नाही. तो त्वरित लावावा, अशी मागणी केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळाला अनावश्यक खरेदी, नोकर भरती, शाखा विस्तार करण्यास परवानगी देऊ नये, यासाठी कर्ज वितरण सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत. तसेच १५ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या संस्थेच्या गुणवंत गुणगौरव समारंभात आतापर्यंत २१ ते २३ शिक्षकांनाच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी मात्र ५८ पुरस्कार जाहीर करून प्रत्यक्षात ८० पुरस्कार वितरित करण्यात आल्याने झालेला अनावश्यक खर्च या संचालक मंडळांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीचे पदाधिकारी प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम रकिबे, वासुदेव बधान,बाळासाहेब सोनवणे, हिरामण शिंदे, महेश अहिरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
फोटो स्कॅनिंगला दिला आहे.