मागणीचा जोर वाढला; सोन्याचे भाव वधारले

By Admin | Updated: June 23, 2014 23:45 IST2014-06-23T23:45:39+5:302014-06-23T23:45:39+5:30

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापा:यांकडून झालेल्या चांगल्या खरेदीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वधारला.

Demand of demand increased; Gold prices rose | मागणीचा जोर वाढला; सोन्याचे भाव वधारले

मागणीचा जोर वाढला; सोन्याचे भाव वधारले

>नवी दिल्ली : जागतिक बाजारात कमजोर स्थिती असतानाही लग्नसराईच्या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापा:यांकडून झालेल्या चांगल्या खरेदीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वधारला. 6क् रुपयांच्या किरकोळ वाढीसह सोन्याचा भाव 28,785 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. दुसरीकडे चांदीचा भाव मात्र, औद्योगिक संस्थांच्या मागणीअभावी 1क्क् रुपयांनी घसरून 44,8क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसराईतील ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन झालेल्या खरेदीमुळे सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारात मात्र, घसरणीचा कल नोंदला गेला. लंडन बाजारात सोन्याचा भाव क्.15 टक्क्यांनी कमी होऊन 1,312.7क् डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 6क् रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे 28,785 रुपये आणि 28,585 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. गेल्या दोन सत्रंत यात 7क्क् रुपयांची वाढ झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांनी कमी होऊन 44,8क्क् आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 145 रुपयांनी घटून 44,425 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी उसळून खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये, तर विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Demand of demand increased; Gold prices rose