पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आह़े

The demand for completion of the extraction of percolation pond | पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी

पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी

लापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आह़े
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील पाझर तलावाचे काम 2004 साली बंद पडले आह़े अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत ग्रामसभेने 10 वेळा ठराव केला, मात्र कोणत्याही अधिकार्‍याने याकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने आजतागायत हे काम अपूर्ण अवस्थेत आह़े कर्देहळ्ळी परिसरात पाणीटंचाई जाणवत आह़े याशिवाय पाझर तलावात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकर्‍यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही़ त्यामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्वरित लक्ष घालून पाझर तलावाचे काम सुरू करावे, अशी मागणी सरपंच दीपक सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आह़े

Web Title: The demand for completion of the extraction of percolation pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.