जातींची आकडेवारी देण्याची मागणी

By Admin | Updated: July 14, 2015 02:03 IST2015-07-14T02:03:02+5:302015-07-14T02:03:02+5:30

आर्थिक- सामाजिक-जातीनिहाय जनगणनेतील जातीनिहाय आकडेवारी जारी करण्यात न आल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी भाजपप्रणीत

Demand for breed statistics | जातींची आकडेवारी देण्याची मागणी

जातींची आकडेवारी देण्याची मागणी

पाटणा : आर्थिक- सामाजिक-जातीनिहाय जनगणनेतील जातीनिहाय आकडेवारी जारी करण्यात न आल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी भाजपप्रणीत रालोआ सरकारवर जोरदार हल्ला चढविला. जनगणनेतील जातींची आकडेवारी दडवून ठेवण्यामागे काय कारण आहे, असा सवाल नितीशकुमार यांनी केला आहे. ‘आर्थिक-सामाजिक जनगणनेतील जातीनिहाय आकडेवारी जाणून घेण्याची लोकांची इच्छा आहे. सरकार ही आकडेवारी जारी न करण्यामागचे कोणते स्पष्टीकरण देणार आहे,’ असा सवाल नितीशकुमार यांनी केला. ‘जनता कें दरबार में मुख्यमंत्री’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Demand for breed statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.