ंअवजड वाहनांना सर्व्हीस रोडवर बंदी करण्याची मागणी
By Admin | Updated: April 15, 2016 23:37 IST2016-04-15T01:55:11+5:302016-04-15T23:37:15+5:30
ओझर टाऊनशिप- येथील मुंबई महामार्गावर असलेल्या बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेल व टिळकनगर ते बाणगंगा पुल या दरम्यान महामार्गावरील समांतर सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ंअवजड वाहनांना सर्व्हीस रोडवर बंदी करण्याची मागणी
ओझर टाऊनशिप- येथील मुंबई महामार्गावर असलेल्या बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेल व टिळकनगर ते बाणगंगा पुल या दरम्यान महामार्गावरील समांतर सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
एच.ए.एल.उड्डाण पुल ते गायखे पेट्रोल पंप या दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेलपर्यंत व टिळकनगर ते बाणगंगा पुल असे दोन सर्व्हीसरोड ओझरकडून नाशिकला व नाशिककडून ओझरकडे येण्यासाठी दिलेले असून या सर्व्हीस रोडवरुन मालट्रक कंटेनर व एस.टी.बसेस कडून जाण्या येण्यासाठी सर्रास वापर केला जातो. त्यामुळे अपघात होतात. या सर्व्हीस रोड वरुन जातांना येतांना कार व दुचाकी चालकांना आपले वाहन जीव मुठीत धरुनच चालवावे लागतात म्हणून या सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, तसेच हॉटेल सावित्री समोर असलेल्या महामार्गावरील चौकात हायमॅक्स लाईट बसवावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)
-----