शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत देण्याची मागणी
By Admin | Updated: April 22, 2015 02:47 IST2015-04-22T02:47:21+5:302015-04-22T02:47:21+5:30
अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक तडाखा उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा व महाराष्ट्र या राज्यांना बसला असून

शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत देण्याची मागणी
नवी दिल्ली : अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक तडाखा उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा व महाराष्ट्र या राज्यांना बसला असून निसर्गाच्या या उत्पाताखाली भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या राज्यांनी १०,१०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे, असे आज लोकसभेत सांगण्यात आले.
गेल्या तीन महिन्यात पाऊस व गारपिटीमुळे १४ राज्यांतील ९४ लाख हेक्टर जमिनीतील पीक बाधित झाले आहे, असे कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी सांगितले. महाराष्ट्रात पाऊस व गारपिटीमुळे ९.८९ लाख हेक्टर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे.
अनेक राज्यांना राज्य सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत घ्यावी, असे सांगण्यात आले आहे, असेही सिंग यावेळी म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)