डिलीव्हरी बॉयने महिला कस्टमरकडे केली सेक्सची मागणी

By Admin | Updated: July 12, 2016 11:00 IST2016-07-12T10:42:01+5:302016-07-12T11:00:21+5:30

फूड डिलिव्हरी नाकारणा-या महिलेचा फोनवरुन लैंगिक छळ करणा-या फूड डिलिव्हरी बॉयला जेपी नगर पोलिसांनी अटक केली आहे.

Delivered Beyond Sex Offer To Female Customer | डिलीव्हरी बॉयने महिला कस्टमरकडे केली सेक्सची मागणी

डिलीव्हरी बॉयने महिला कस्टमरकडे केली सेक्सची मागणी

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १२ - फूड डिलीव्हरी नाकारणा-या महिलेचा फोनवरुन लैंगिक छळ करणा-या फूड डिलीव्हरी बॉयला जेपी नगर पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाने पिडित महिलेचा फोन नंबरही  व्हॉटस अॅप ग्रुपवर टाकला. त्यामुळे सेक्स सुखाची मागणी करणारे शेकडो फोन्स या महिलेला आले. महिलेला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे कृत्य केल्याचे आरोपी श्रेयसने पोलिसांना सांगितले. 
 
पिडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार तिने आठ जुलैला फूटपांडा या ऑनलाइन फूड वेबासाईटवरुन मॅकडोन्लडमधून फूड मागवले. रात्री दहाच्या सुमारास डिलीव्हरी बॉय श्रेयस ऑर्डर पोहोचवण्यासाठी या महिलेच्या घरी आला. डिलीव्हरी देताना त्याने माझ्याकडे बघून अश्लील कमेंटस केल्या आणि तो निघून गेला असे पिडित महिलेचा दावा आहे. 
 
फूड डिलीव्हरी दिल्यानंतर अर्ध्यातासाने या महिलेला पुन्हा श्रेयसचा फोन आला. त्याने पिडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने श्रेयसला फोनवरुन झापले व फोन कट केला. त्यानंतर या महिलेला १४ मोबाईल क्रमांकावरुन फोन आले. फोन करणारे या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करायचे. शेवटी या त्रासाला कंटाळून पिडित महिलेने पोलिसात धाव घेतली. 
 
पोलिसांनी या महिलेला ज्या क्रमांकावरुन फोन आले त्यावरुन तपास करत श्रेयसला अटक केली. फूड डिलीव्हरीवरुन महिलेबरोबर वाद झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. महिलेला ते पदार्थ नको होते म्हणून ती परत घेऊन जायला सांगत होती. पण ते शक्य नव्हते. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. या महिलेला धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण हे केल्याचे श्रेयसने पोलिसांना सांगितले. 
 
 
 

Web Title: Delivered Beyond Sex Offer To Female Customer