दिल्लीच्या निकालांनी काँग्रेस स्तब्ध पुन्हा उभारी घेण्याचा आशावाद
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:20+5:302015-02-11T00:33:20+5:30
नवी दिल्ली : दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारल्यानंतर काँग्रेस स्तब्ध आहे़ मात्र या पराभवानंतरही पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेसने बोलून दाखवला आहे़

दिल्लीच्या निकालांनी काँग्रेस स्तब्ध पुन्हा उभारी घेण्याचा आशावाद
न ी दिल्ली : दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारल्यानंतर काँग्रेस स्तब्ध आहे़ मात्र या पराभवानंतरही पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेसने बोलून दाखवला आहे़काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीचा कौल नम्रपणे स्वीकारत, आम्ही दिल्लीकरांच्या जनादेशाचा सन्मान करतो असे म्हटले आहे़ तिकडे काँग्रेसच्या पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या माथी फुटू नये म्हणून, दिल्लीच्या निवडणुकीत पक्षाचा चेहरा राहिलेले अजय माकन यांनी पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे़ दिल्ली निवडणुका स्थानिक मुद्यांवर लढल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे़ अर्थात काँग्रेसचे अनेक नेते पक्षाच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा करीत आहे़ दिल्लीतील लाजिरवाण्या पराभवामागे पक्षातील अंतर्गत कलह हेही एक कारण असल्याचे अनेक काँग्रेस नेते आता बोलू लागले आहेत़काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीच्या निवडणूक प्रचारात उतरले असते तर आज चित्र थोडेफार वेगळे असते, अशी प्रतिक्रिया पक्षनेते मनीष तिवारी यांनी दिली आहे़ काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुण्या एका व्यक्तीच्या माथी फोडणे योग्य नाही़ पक्षाला नवउभारी देण्यासाठी गंभीर आत्मचिंतनाची गरज आहे़ येत्या काळात काँग्रेसचे गतवैभव परत मिळेल, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे़