दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तात्काळ भारतात परतण्याचे आदेश
By Admin | Updated: September 17, 2016 18:48 IST2016-09-17T18:48:04+5:302016-09-17T18:48:04+5:30
डेंग्यु,चिकुनगुनिया अशा साथीच्या तापाने दिल्ली फणफणत असताना दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तात्काळ भारतात परतण्याचे आदेश
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.17-डेंग्यु,चिकुनगुनिया अशा साथीच्या तापाने दिल्ली फणफणत असताना दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तात्काळ भारतात परतण्याचे आदेश दिले आहेत.
सिसोदिया हे सध्या फिनलँडच्या दौऱ्यावर आहेत. तेथील शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी ते दौ-यावर गेले आहेत. मात्र,अधिकाऱ्यांसमवेत फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
नजीब जंग यांनी सिसोदिया यांना तात्काळ दिल्लीत परतण्याचे आदेश दिले असून अन्यथा हा दौरा अवैध ठरविण्यात येईल, असा इशारा दिला आहे.