शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला छावणीचे स्वरूप : कुस्तीपटूंवर चालविल्या लाठ्या, आंदोलन स्थळावरून तंबू उखडून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 06:56 IST

संसद भवनापासून ४०० मीटर अंतरावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर लाठ्या चालविण्यात आल्या.

संजय शर्मानवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप आले होते. संसद भवनापासून ४०० मीटर अंतरावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर लाठ्या चालविण्यात आल्या. त्यांचे तंबू उखडून फेकून देण्यात आले.

काँग्रेससह २० विरोधी पक्षांच्या बहिष्कारामुळे भीतीच्या वातावरणात संसद भवनाचे उद्घाटन झाले. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजीच्या पोलिस बंदोबस्तापेक्षाही जास्त कडक बंदोबस्त या कार्यक्रमासाठी होता. नवी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर काल रात्रीपासूनच बॅरिकेड्स करण्यात आले होते. सर्वसामान्य लोकांना नवी दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यात आले. कुस्तीपटूंनी बॅरिकेड्स ओलांडून नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाल्यानंतर विनेश फाेगट, संगीता फाेगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह समर्थकांवर पोलिसांनी लाठ्या चालविल्या. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा विनेश, संगीता आणि साक्षी यांना सोडून दिले, तर बजरंग पुनिया उशिरापर्यंत ताब्यात होते.

माध्यमकर्मींनी सर्व पास दाखविले तरी त्यांना रोखले जात होते. पावलोपावली पोलिस, सीआरपीएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आले होते. पोलिस नियंत्रण कक्ष, पीसीआर क्षणाक्षणाची माहिती घेत होते. विरोधकांकडून आजच्या आयोजनात बाधा आणण्याचा प्रयत्न केला जाण्याच्या शक्यतेने ही खबरदारी घेण्यात आली होती.

कुस्तीपटूंच्या समर्थकांनाही सोडले नाहीजंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पदक विजेत्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी बळाच्या जोरावर रस्त्यावरून उचलले व त्यांचे तंबू उखडून फेकले. कुस्तीपटूंना मारहाण करण्याचा विरोध करण्यासाठी आलेल्या त्यांच्या समर्थकांवरही पोलिसांनी काठ्या चालविल्या व त्यांना जंतरमंतरहून हटवले.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी कुस्तीपटूंनी नवीन संसदेसमोर निदर्शने करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले होते. कुस्तीपटूंना मारहाण करून तेथून हटवण्यात आले.

रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत दिल्लीकरांना या प्रकाराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. कुस्तीपटूंच्या समर्थकांनाही नवी दिल्लीच्या भागात जाण्यापासून रोखण्यात आले. हरयाणा व पश्चिम उत्तर प्रदेशमधून दिल्लीत येणाऱ्या वाहनांची वाहतूक आधीच वळविण्यात आली होती.

टिकैत यांचा प्रवेश रोखला, गाझीपूर सीमा बंद नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला येत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांना रविवारी पोलिसांनी गाझीपूर सीमेवर रोखले तेव्हा त्यांनी तेथेच धरणे धरले. नवीन संसद भवनाजवळ आंदोलक कुस्तीपटू महिला सन्मान महापंचायत घेणार होते. त्यात सहभागी होण्यासाठी शेतकरी दिल्लीला येत होते. त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा कडे उभारले होते. शेतकऱ्यांनी ते ओलांडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :delhiदिल्ली