पती लैंगिकदृष्ट्या समाधान देऊ शकत नसल्याने एका २९ वर्षीय पत्नीने त्याची हत्या केली. ही घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात रविवारी संध्याकाळी घडली. आपल्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठी पतीने आत्महत्या केल्याचा आरोपी महिलेने बनाव रचला. परंतु, मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने हत्येचे कबूली दिली.
फरजाना खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी फरजाना खान तिचा पती शाहीदला खानला जखमी अवस्थेत संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी शाहीदला तपासून मृत घोषित केले. शाहिदीने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची सांगितले. परंतु, शाहीदच्या शरीरावर तीन जखमा आढळल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना फोन केला.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नपोलीस चौकशीदरम्यान फरजानाने सांगितले की, "शाहीदला जुगाराचे खेळण्याचा नाद होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला आणि गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. रविवारी संध्याकाळी त्याने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या केली." परंतु, सोमवारी शवविच्छेदनाच्या अहवालातून शाहिदची हत्या करण्यात आली, असे निष्पन्न झाले. शाहिद शरीरावर अशा प्रकारच्या जखमा आढळल्या, त्या कोणीही स्वतः करू शकत नाही, अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.
फोनमुळे सत्य उघडयानंतर पोलिसांनी फरजानाचा फोन तपासला असता सत्य समोर आले. शाहिदीच्या हत्येआधी फरजानाने इंटरनेटवर झोपेच्या गोळ्या देऊन एखाद्याला कसे मारायचे? हे शोधले. शिवाय, मोबाईलमधील चॅट हिस्ट्री कशी डिलिट करायची? हे देखील तिने शोधले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी फरजनाची कसून चौकशी केली असता तिने शाहिदीच्या हत्येची कबूली दिली.
लैंगिकदृष्ट्या समाधानी करत नसल्याने हत्यापोलिसांनी सांगितले की, फरजाना शाहीदीकडून लैंगिकदृष्ट्या समाधानी नव्हती. तिचे शाहिदच्या बरेली येथे राहणाऱ्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी फरजानाला मंगळवारी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.