शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi violence : 'दिल्लीतील हिंसा जिहादी शक्तिंचा पूर्वनियोजित कट', भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:34 IST

खालिद यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत बग्गा यांनी दिल्लीतील हिंसाचाराला

नवी दिल्ली - दिल्लीतीलभाजपा नेते आणि दिल्लीच्या हरी नगर विधानसभेचे भाजपा उमेदवार तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दिल्लीतील हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित होती असे म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी उमर खालिदचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, जिहादी शक्तींकडून हा कट पहिल्यापासूनच रचण्यात आला होता. 17 फेब्रुवारीचं उमर खालिद यांचं हे भाषण त्याचा पुरावा असल्याचं बग्गा यांनी म्हटलंय. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यानंतरच दिल्लीतील हिंसाचार भडकला. दिल्लीतील हिंसाचारात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आणि तेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपा नेते कपिल मिश्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते ताहिर हुसैन यांची नावे समोर आली आहेत. आता, जेएनयुतील विद्यार्थी संघटनेचा सदस्य उमर खालिद याच नाव समोर आलं आहे. भाजपा नेते तजिंदलपाल सिंग बग्गा यांनी याबाबतच व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओत उमर खालिद सीएए आणि एनआरसीविरोधात भाषण देत आहेत. या भाषणावेळी, डोनाल्ड ट्रम्प ज्यादिवशी भारतात येतील, त्यादिवशी आम्ही दिल्लीच्या रस्त्यावर उतरणार, असे खालिदने म्हटले आहे. मोदींचा खरा चेहरा आम्ही ट्रम्प यांच्यासमोर आणू. 24 फेब्रवारी रोजी ट्रम्प भारतात येतील, तेव्हा त्यांना दाखवून देऊन की, मोदी सरकार देशाला वेगळं करण्याचा घाट घालत आहे. महात्मा गांधींच्या विचारांना नष्ट करत आहेत. त्यादिवशी आम्ही भारतीय नागरिक रस्त्यावर उतरणार आहोत. 

खालिद यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत बग्गा यांनी दिल्लीतील हिंसाचाराला तुकडे-तुकडे गँग जबाबदार असल्याचं म्हटलंय. तसेच देशाला बदनाम करण्याचा कट रचल्याचांही आरोप बग्गा यांनी उमर खालिद यांच्यावर केलाय. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीUmar Khalidउमर खालिदBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प