शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

Delhi Violence: रस्ते निर्मनुष्य, तणाव मात्र कायम; दगडफेक, आगीच्या तुरळक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 06:59 IST

कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.

- विकास झाडे नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांत हिंसाचाराने २४ बळी घेतले. पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे चित्र असले तरी गल्लीबोळात धग कायम आहे. कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.या भागात फेरफटका मारताना पुढच्या क्षणी काय होईल? अशी भीती मनात असते. प्रत्येकाचीच अशी अवस्था आहे. सोनिया विहार, गोकुळपुरी भागातील एका टायरच्या व भंगार दुकानांना आज आगी लावण्यात आल्या. जाफराबाद, कबीरनगर, विजयपार्क, मौजपुर, करावल नगर इथेही काहीशी दगडफेक झाली. उपद्रवी व असामाजिक व्यक्तींकडून सोशल मीडियात हिंसाचाराच्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असल्याने हिंसाचार होत आहे.ईशान्य दिल्लीतील हिंसाग्रस्त भागात बुधवारी सकाळी पोलीस व निमलष्करी दलाचा फ्लॅगमार्च झाला. तिथे सशस्त्र पोलीस आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या, दंगलविरोधी ‘वज्र’ वाहन आणि आकस्मिक मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. रस्ते निर्मनुष्य आहेत. सर्वत्र जाणवतो केवळ तणावच. हिंसाचाराच्या भीतीने लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत. गल्लीबोळात मात्र ते गटांमध्ये दिसून येत आहेत. मौजपूरजवळील कबीरनगर परिसरात दोन दिवस जाळपोळ झाली. समाजकंटकांनी घरे व दवाखान्यांच्या खिडक्यांचा चुराडा केल्याने तिथे दहशत आहे. मंगळवारी इथे गोळीबार करण्यात आला. दोनशेवर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळेच आज पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख होता.शांततेसाठी आवाहन!सर्वाधिक हिंसा झालेल्या जाफराबाद येथील मस्जिदीतून बुधवारी सायंकाळी शांततेचे आवाहन करण्यात आले. मुस्लिमांनी हिंसाचारात सहभागी होऊ नका, घराबाहेर पडू नका आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे करा, असे हे आवाहन होते.मंगळवारी रात्री असंख्य तरूण या भागात लोखंडी सळाखी, चाकू, लाठ्या घेऊन गल्लीबोळात फिरत होते. या मस्जिदीसमोर राहणारे ताहीर म्हणाले, आम्हाला हिंसा नको, सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.

टॅग्स :delhi violenceदिल्ली