शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आधीच ठरला होता दिल्ली दंगलीचा प्लॅन? पीएफआय, खुरासान मॉड्युलवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 15:34 IST

delhi violence News : आयएसशी संबंधित काश्मिरी जोडप्याला झालेली अटक आणि आता पीएफआयचा सदस्य असलेल्या दानिशला करण्यात आलेल्या अटकेनंतर या दंगलीमागील मोठ्या कारस्थानाबाबत संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीमध्ये अनेकांचा बळी गेला होता. आता या दंगलीबाबतची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. आयएसशी संबंधित काश्मिरी जोडप्याला झालेली अटक आणि आता पीएफआयचा सदस्य असलेल्या दानिशला करण्यात आलेल्या अटकेनंतर या दंगलीमागील मोठ्या कारस्थानाबाबत संकेत मिळू लागले आहेत. गेल्या दोन दिवसात झालेली संशयितांची धरपकड आणि पीएफआय तसेच खुरासान मॉड्युलचे नाव समोर येऊ लागल्याने दिल्लीतील दंगलीचा प्लॅन आधीच ठरला होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्लीतील जमिया परिसरातून अटक करण्यात आलेल्या जहांबेज शामी आणि हीना यांचे आयएसच्या खुरासान मॉड्युलशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते सक्रिय होते, तसेच सीएए, सरकार आणि एका समुदायाविरोधात ते लोकांना भडकवत होते, असा आरोप आहे. तर पीएफआयशी संबंधित असलेला दानिश सीएएविरोधी आंदोलनांदरम्यान खोटी माहिती पसरवून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असे, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या तिघांना झालेल्या अटकेनंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तहेर संघटना आयएसआयच्या इशाऱ्यावरून तर दिल्लीत दंगल भडकवण्यात आली नाही ना, याचा शोध घेतला जात आहे. आयएसआयएसच्या खुरासान मॉड्युलला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयनेच उभे केले होते. रविवारी जामियानगर परिसरातून ज्या दाम्पत्यास अटक करण्यात आली होती.  ते याच संघटनेशी संबंधित होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत. दोघांचीही अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. या खात्यांद्वारे भारतीय मुसलमानांना एकजूट करून आणि सरकारविरोधात सीएएवरून आंदोलन भडकविण्याचे काम सुरू होते. सामीच्या सायबरस्पेसमध्ये संशयस्पद हालचाली पाहून स्पेशल सेलने त्याच्यावर मागिल महिनाभरापासून नजर ठेवली होती. याशिवाय आयबीनेही दोघांच्याबाबतीत गुप्त माहिती दिली होती. चौकशीमध्ये सामीने सांगितले की, मुस्लिम बहुल भागात जाऊन लोकांना भडकविण्याचे काम करत होतो. 

संबंधित बातम्या

Delhi Violence : आयबी अधिकाऱ्याची हत्या ताहिर हुसैनच्या भावाकडून? पोलिसांकडून शोध सुरू

...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला

दिल्लीतील हिंसा सुनियोजित अन् एकतर्फी; अल्पसंख्यांक आयोगाचा धक्कादायक खुलासाआयएसकेपीने त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांना याद्वारे मोठ्या दहशतवादी हल्ल्याला यशस्वी करायचे होते. सामी शाहीन बाग आणि दिल्लीतील अन्य ठिकाणी जाऊन त्यांना हे भारत सरकार हटवायचे असल्याचे सांगत होता.

टॅग्स :delhi violenceदिल्लीdelhiदिल्लीISISइसिस