शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३ पोलीस ठाणे, १२ किमीचा रस्ता आणि ९ PCR व्हॅन...तरीही तरुणीला फरफटत नेताना पोलिसांना दिसलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 20:55 IST

दिल्लीच्या सुल्तानपुरी ते कांझावलाच्या दरम्यान खडकाळ रस्ता आहे. याच रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे एका २० वर्षाच्या तरुणीला असह्य वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जावं लागलं.

नवी दिल्ली-

दिल्लीच्या सुल्तानपुरी ते कांझावलाच्या दरम्यान खडकाळ रस्ता आहे. याच रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे एका २० वर्षाच्या तरुणीला असह्य वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जावं लागलं. दिल्लीत नववर्ष स्वागताच्या रात्री पार्टीच्या धुंदीत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या पाच तरुणांनी एका तरुणीला धडक दिली आणि तब्बल १२ किमी फरफटत नेलं. यात तिचा मृत्यू झाला. 

१२ किमीच्या रस्त्यात तीन पोलीस ठाणे आहेत. तर ९ पीसीआर व्हॅन आहेत आणि दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त सुरू असते असा दावा पोलिसांकडून केला जातो. मग भर रस्त्यात तब्बल १२ किमी दूरवर एका तरुणीला कारमधून भरधाव वेगात जाणाऱ्या पाच जणांनी फरफटत नेलं. यात तरुणीचा कधी मृत्यू झाला हेही कळलं नाही. घटना इतकी भयंकर आहे की इतक्या दूरवर तिला फरफटत नेल्यामुळे तरुणीच्या शरीरावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही. तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत दुसऱ्या दिवशी सकाळी आढळून आला. १२ किमीच्या रस्त्यात ३ पोलीस ठाण्यापैकी कुणीच ही घटना पाहिली नाही किंवा गस्तीवर असणाऱ्या ९ पोलीस व्हॅनलाही या घटनेचा मागमूस नाही. 

फक्त एका व्यक्तीनं दाखवली हिंमतदिल्ली पोलिसांचं गस्ती पथक तिला पाहू शकलं नाही किंवा ती कारही त्यांना दिसू शकली नाही. पण दीपक नावाच्या तरुणानं मात्र माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं. बलेनो कारच्या मागे एक तरुणी अडकली असून तिला फरफटत नेलं जात असल्याचं त्यानं पाहिलं. दीपकनं जवळपास दोन तास त्या कारचा पाठलाग केला. दीपकमुळेच संपूर्ण घटनेची माहिती मिळाली नाहीतर पोलीस या दुर्घटनेला एक सर्वसाधारण अपघात म्हणून नोंद करुन मोकळे झाले होते. 

पोलिसांनी काय सांगितलं?दिल्ली पोलिसामधील डीसीपी यांच्याकडून या घटनेबाबत एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. "एक जानेवारीच्या मध्यरात्री ३ वाजून २४ मिनिटांनी एका व्यक्तीनं पीसीआरमध्ये फोन केला. एक बलेनो कार जी कुतुबगडच्या दिशेनं जात असून कारला एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आहे. फरफटत नेलं जात आहे, असं फोनवर सांगण्यात आलं होतं", अशी माहिती डीसीपींनी दिली.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात