शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत उष्णतेमुळे एका आठवड्याने वाढवली शाळांची उन्हाळी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 17:27 IST

राजधानी दिल्लीतील तापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीतील तापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये उष्णतेची लाट असून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली आहे.

नवी दिल्ली - मान्सूनपूर्व पावसाला उशीर झाल्याने देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढले आहे. राजधानी दिल्लीतीलतापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

दिल्लीमध्ये उष्णतेची लाट असून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली आहे. दिल्लीतील शाळा आता 8 जुलैपासून सुरू होणार आहेत. तर नववी आणि दहावीचे वर्ग नियोजित वेळेत सुरू होणार आहेत. हा आदेश खासगी शाळांना देखील लागू असेल असे सिसोदिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

दिल्लीमध्ये 10 जून रोजी 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेल्याची माहिती स्कायमेटने दिली होती. हवामान खात्याने पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन लांबल्याने तापमान वाढले आहे. उष्ण वारे वाहत असल्याने दिल्लीकर मेटाकुटीला आले आहेत. 

दिल्लीच्या पालममध्ये 9 जून 2014 रोजी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत सकाळी कडक ऊन पडतं. त्यानंतर दुपारी उष्ण वारे वाहू लागलात. दिल्लीत पारा 50 अंशांच्या आसपास पोहोचला असताना राजस्थानमध्ये तापमानाने पन्नाशी पार केली आहे. चुरू भागात पाऱ्यानं पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. 

 

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमानSchoolशाळाStudentविद्यार्थी