शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:42 IST

Delhi Red Fort Car Blast Umar Photo Revealed: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर आला आहे

Delhi Red Fort Car Blast Umar Photo Revealed: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमर मुहम्मदचा (Dr Umar Muhammad) पहिला फोटो समोर आला आहे. त्याने काल संध्याकाळी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले होते. मंगळवारी झालेल्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची i20 कार बाहेर पडताना दिसत आहे. त्यात असलेला डॉक्टर हा मोहम्मद उमर असल्याचा संशय आहे. या स्फोटाबाबत पोलिसांनी सांगितले की उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे छापे सुरू आहेत, ज्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनौपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली होती.

दिल्ली पोलिस आणि इतर तपास संस्थांच्या तपासात असे समजले की, उमर हा पार्क केलेल्या i20 कारमध्ये तीन तास बसून राहिला. तो एका मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही. असे म्हटले जात आहे की तो या कारमधून हल्ला कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा याबद्दल सूचनांची वाट पाहत थांबला होता. याचदरम्यान, त्याचा एक फोटो समोर आला आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अनेक प्रसारमाध्यमांनी उमरचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

या स्फोट प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण घटनेचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल असे सांगितले जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर दिसला...

लाल किल्ल्याजवळील स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक आय-२० कार पार्किंगमधून जात असल्याचे दिसून आले आहे. कारच्या आत काळा मास्क घातलेला एक माणूस आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Red Fort Blast: First photo of car bomber Umar surfaces.

Web Summary : Delhi police investigate Umar Muhammad, suspected in the Red Fort car blast. CCTV footage shows a suspicious car. Umar, potentially part of a Faridabad module, awaited instructions before the explosion. Investigation continues.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोटcarकारViral Photosव्हायरल फोटोज्