Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. सज्जाद अहमद हा स्फोटात स्वतःला उडवून देणाऱ्या डॉ. मोहम्मद उमरचा मित्र आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सज्जादला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील कारचा चालक फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला होता. पुलवामा येथील रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर उमर मोहम्मद लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील पार्किंग क्षेत्रात झालेल्या स्फोटात वापरलेली हुंडई कार चालवत होता. स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डेटोनेटरचा वापर केला असावा, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली स्फोट फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जाऊ शकतो, तिथून ३६० किलोग्राम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
कार चालक मास्क घातलेला दिसला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती कार चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी एका संथ गतीने चालणाऱ्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत. या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला, २५ जण जखमी झाले आणि अनेक वाहने जळून खाक झाली.
Web Summary : Pulwama connection surfaces in Delhi Red Fort blast case. Dr. Sajjad Ahmed, friend of bomber Dr. Umar, arrested. Blast linked to Faridabad terror module; ammonium nitrate used. Ten dead, twenty-five injured.
Web Summary : दिल्ली लाल किला विस्फोट मामले में पुलवामा कनेक्शन सामने आया। बमवर्षक डॉ. उमर का दोस्त डॉ. सज्जाद अहमद गिरफ्तार। विस्फोट फरीदाबाद आतंकी मॉड्यूल से जुड़ा; अमोनियम नाइट्रेट का इस्तेमाल। दस की मौत, पच्चीस घायल।