शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:17 IST

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या प्रकरणात दिनेश आणि देवेंद्र ही दोन नावे देखील समोर आली आहेत.

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटामुळे अवघ्या देश हादरून गेला आहे. या भीषण स्फोटात तब्बल १० जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या असून, एजन्सी या प्रकरणाचा तापस करत आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला. या प्रकरणात दिनेश आणि देवेंद्र ही दोन नावे देखील समोर आली आहेत. हे दोघे कोण आहेत आणि यांचे या स्फोटाशी काय कनेक्शन आहे, हे देखील आता समोर आले आहे. 

दिनेश आणि देवेंद्र हे थेट या स्फोटाशी संबंधित नसले, तरी स्फोट झालेल्या गाडीशी त्यांचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. ज्या 'आय २०' कारमध्ये स्फोट झाला ती कार देवेंद्र याने खरेदी केली होती. देवेंद्र हा ओखलाचा रहिवासी असून, त्याने दीड वर्षांपूर्वी ही गाडी खरेदी केली होती. तर, ही कार दिनेश नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. त्याचे घर गुरुग्राम येथील शांतीनगरमध्ये आहे. मात्र, या दोघांचाही या स्फोटाशी काही संबंध असल्याचे समोर आलेले नाही.

कारचे पुलवामाशी आहे कनेक्शन!

स्फोट झालेली कार ही पुलवामाचा डॉ. उमर चालवत होता. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही संशयिताच्या आईला डीएनए नमुने देण्यासाठी बोलावले आहे, स्फोटस्थळी सापडलेल्या शरीराच्या अवयवांशी ते जुळणारे आहे का हे तपासले जाईल." डॉ. उमर नबी कथितपणे आय२० कार चालवत होता. तो पुलवामातील कोइल गावात राहत होता. या स्फोटात वापरलेल्या कारच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या तीन लोकांनाही आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी स्फोट झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे आढळून आले की, ही कार पहाटे ३:१९ वाजता पार्क करण्यात आली होती आणि नंतर तीन तासांनंतर सकाळी ६:४८ वाजता पार्किंगमधून बाहेर काढण्यात आली होती.

सध्या, पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. गाडीत कोण होते, ती कोणी पार्क केली आणि ती घेण्यासाठी कोण आले हे शोधण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून गाडी कुठून निघाली, ती प्रथम लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कुठे आली आणि नंतर ती पार्किंगमधून कशी निघून लाल किल्ल्यासमोरील कशी पोहोचली हे देखील शोधले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Red Fort Blast: Devendra and Dinesh connection revealed; who are they?

Web Summary : Delhi blast kills 10 near Red Fort. Car linked to Devendra and registered to Dinesh. Car was driven by Pulwama's Dr. Umar. Police investigate CCTV footage.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट