दिल्ली-राहुल-अंकात आतील पानात अवश्य

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30

स्मार्ट सिटीवर भरणार काँग्रेसची महापरिषद

Delhi-Rahul-Ankarn must be on the inside page | दिल्ली-राहुल-अंकात आतील पानात अवश्य

दिल्ली-राहुल-अंकात आतील पानात अवश्य

मार्ट सिटीवर भरणार काँग्रेसची महापरिषद
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली :महाराष्ट्रात स्मार्ट सिटी योजनेच्या संदर्भात विविध क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची एक महापरिषद आयोजित करण्याची तयारी महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखेंनी केली असून त्याचे निमंत्रणही त्यांनी उपाध्यक्ष खा. राहुल गांधींसह २४ राज्यांतील काँग्रेसच्या विघिमंडळ पक्षनेत्यांना दिले.
खा.राहुल गांधींनी सोमवारी विविध राज्यांतील काँग्रेस विधीमंडळ पक्षनेत्यांची व विरोधी पक्षनेत्यांची बैठक दिल्लीत आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसेतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यातील काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांची बैठक काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच दिल्लीत संपन्न झाली. गुरूव्दारा रकाबगंज मार्गावर काँग्रेसच्या वॉर रूममधे आयोजित या बैठकीस २४ राज्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते.
बैैठकीच्या कामकाजाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. पत्रकारांना माहिती न देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने कोणीही बोलायला तयार नव्हते. तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नेत्यांकडून जवळपास दोन तास राहुल यांनी प्रत्येक राज्याची राजकीय स्थिती समजावून घेतली. चर्चेचा प्रारंभ शंकरसिंग वाघेलांनी केला.
संसदेत भू संपादन कायद्याचा विषय काँग्रेसने लावून धरला. अखेर सरकारला या विषयावर माघार घेत झुकावे लागले, त्याचे उदाहरण देत राहुल म्हणाले, जनतेच्या समस्यांना वाचा फोडतांना एकाचवेळी अनेक विषयांना प्राधान्य देण्यापेक्षा महत्वाच्या विषयाला अधोरेखित केले तर कशाप्रकारे यश मिळू शकते, याचे हे ताजे उदाहरण आहे.
राज्यांमधील काँग्रेसच्या वैधानिक कामगिरीचा आढावा घेतांना महाराष्ट्र वगळता देशाच्या अन्य राज्यात विधानसभेच्या कामकाजाचा कालावधी फारच थोडा आहे. गुजरातमध्ये तर अवघ्या ४ दिवसात अधिवेशन गुंडाळलेे जाते. अनेक राज्यांत विरोधकांची मुस्कटदाबी होते. त्यांन बोलूू दिलेे जात नाही, अशी व्यथा उपस्थितांनी मांडली.
बैठकीत गुजरातच्या आरक्षण आंदोलनाचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. देशात सर्वच जाती जमातींचे आरक्षण रद्द व्हावे, असा मोदी सरकारचा अंतस्थ डाव आहे. तोगडिया, विहिंपच्या माध्यमातून त्यासाठी या आंदोलनाला विशेष रसद पुरवण्याचा प्रयोग झाला असावा, अशी शक्यता वाघेलांनी बाोलून दाखवली.
प्रत्येक विधीमंडळ काँग्रेस नेत्याने आपापल्या कामकाज पद्धतीचे वर्णनही राहुल गांधींना ऐकवले. मध्यप्रदेशात काँग्रेसने शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. त्याची पुनरावृत्ती अन्य राज्यात करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घ्यावा, असेही राहुल यांनी सुचविले.
------------------------------

Web Title: Delhi-Rahul-Ankarn must be on the inside page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.