दिल्लीच्या सत्तेचे ‘आप’ला वेध

By Admin | Updated: May 19, 2014 02:51 IST2014-05-19T02:51:06+5:302014-05-19T02:51:06+5:30

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या आम आदमी पार्टीत चलबिचल सुरु झाली आहे. त्यातूनच दिल्लीत सरकार स्थापण्यासाठी आमदारांचा एक गट उत्सुक बनला आहे.

Delhi power | दिल्लीच्या सत्तेचे ‘आप’ला वेध

दिल्लीच्या सत्तेचे ‘आप’ला वेध

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या आम आदमी पार्टीत चलबिचल सुरु झाली आहे. त्यातूनच दिल्लीत सरकार स्थापण्यासाठी आमदारांचा एक गट उत्सुक बनला आहे. पण या खेपेस आपला पुन्हा पाठिंबा देण्याऐवजी नव्याने निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करू, असे दिल्ली काँग्रेसने स्पष्ट केले आहे, तर दिल्ली भाजपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज असल्याचे म्हटले आहे़ विधानसभा भंग करणे आणि नव्याने निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ‘आप’ला पुन्हा सरकार स्थापन करण्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे दिल्ली काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता मुकेश शर्मा म्हणाले. काँग्रेसने ‘आप’ सरकारचे समर्थन मागे घेतले नव्हते. केजरीवाल यांनी सरकारचा त्याग केला आणि लोकसभा निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी दिल्लीच्या जनतेला वारेवर सोडले. आता लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याने पुन्हा सरकार स्थापण्याच्या गोष्टी करीत आहेत, असेही ते म्हणाले. रविवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. हर्षवर्धन म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या, असे मला वाटते़ निवडणुका झाल्यास दिल्लीची जनता भाजपाला सत्तेसाठी स्पष्ट कौल देईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Delhi power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.