शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत प्रदुषणामुळे पक्षी कोसळताहेत जमिनीवर; राजधानीचे झाले गॅस चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 01:16 IST

कृषी कचरा व फटाक्यांच्या धुरामुळे हवा झाली विषारी

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणाच्या तडाख्यातून दिल्लीतील पक्षीदेखील सुटले नाहीत. विषारी हवेमुळे श्वसनास अडथळा आल्याने तीन दिवसांत शेकडो पक्षी उडता-उडता जमिनीवर कोसळले. चांदनी चौकातील पक्ष्यांच्या रूग्णालयात शंभरावर कबुतरांवर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला, झाडाखाली निपचित पडलेल्या पक्ष्यांना सहृदयी लोक रुग्णालयात आणल्याने त्यांचा जीव वाचला.पराली (कृषी कचरा) व फटाक्यांच्या धुरामुळे दिल्लीची हवा विषारी झाली. वायू गुणवत्ता निर्देशांक बुधवारी ७०० च्या वर गेला. तज्ज्ञांच्या मते पक्षांना फटाक्यांचा धुराचा त्रास होतो. प्राणवायू कमी पडत असल्याने एकाचवेळी श्वास घेणे व उडण्याची प्रक्रिया गतिमान होते. पक्षी दमतात व जमिनीवर कोसळतात, अशी माहिती चॅरिटी बर्ड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिली.

अनेक पक्ष्यांचे अयवय निकामी होतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो, असे डॉ. हॅरी यांनी सांगितले. तीन दिवसांत या रूग्णालयात १४५ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. फटाक्यांमुळे दोन पक्षी भाजले. त्यांना पुन्हा आकाशात कधीच भरारी घेता येणार नाही.उपचारांनाही मर्यादातीन दिवसांत मी ३०-३५ पक्ष्यांवर उपचार केले. धुक्यामुळे पक्ष्यांना दिसत नाही. त्यामुळे ते इमारतींनाही धडकतात. जखमी होतात. पक्ष्यांचे फुफ्फुस नाजूक असते. त्यामुळे त्यांना औषध देताना विचार करावा लागतो. इंजेक्ट करण्यास मर्यादा असतात. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करणारी औषधे त्यामुळे दिली जातात. - डॉ. हॅरी, चॅरिटी बर्ड हॉस्पिटल, चांदनी चौकहवेत मिसळले विष : दिवाळीनंतर दिल्लीच्या हवेत विष मिसळले आहे. लहान मुले, वृद्धांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. डोळ्यांची जळजळ, अंगास खाज सुटण्यासारखी लक्षणे जाणवू लागली आहेत. सकाळी फिरायला न जाण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. प्रदूषण कमी न झाल्यास 'आरोग्य आणीबाणी' जाहीर होण्याची शक्यता आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी वाढवण्यावरही विचार सुरू आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली