शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Delhi pollution: दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली; सर्व आपत्कालीन उपाय ठरले अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 18:49 IST

पर्यावरणावर देखरेख करणार्‍या SAFAR-India एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता(Delhi AQI)दिवसेंदिवस खराब होत आहेत. दिल्लीची हवा सुधारण्यासाठी केलेले सर्व आपत्कालीन उपाय अपयशी ठरताना दिसत आहेत. गुरुवारी सलग पाचव्या दिवशीही शहरातील हवा 'अतिशय खराब' पातळीवर राहिली. पर्यावरणावर देखरेख करणार्‍या SAFAR-India एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे. एजन्सीने सांगितल्यानुसार, दिल्लीच्या काही भागात पीएम 2.5 ची पातळी 300 च्या आसपास आहे. जागतिक आरोग्य संघटनेने PM 2.5 ची सुरक्षित पातळी 25 पर्यंत सूचीबद्ध केली आहे. यावरून राष्ट्रीय राजधानीतील हवेचा दर्जा किती खालावला आहे, याचा अंदाज बांधता येतो.

PM 2.5 म्हणजे काय ?

PM 2.5 हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ आहे. या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. जेव्हा पीएम 2.5 ची पातळी जास्त असते तेव्हाच धुके वाढते आणि दृश्यमानतेची पातळी घसरते. PM-2.5 चा कण किती लहान आहे हे जाणून घेण्यासाठी हे लक्षात घ्या. (माणसाचे केस सुमारे 100 मायक्रोमीटर आहेत, PM 2.5 चे सुमारे 40 कण केसाच्या रुंदीवर ठेवले जाऊ शकतात.)

फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला

श्वास घेताना धुळीचे हे कण थांबवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या शरीरात नाही. अशा परिस्थितीत पीएम 2.5 आपल्या फुफ्फुसात खोलवर पोहोचतात. PM 2.5 मुळे मुले आणि वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढतो. तसेच खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सततच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो.

प्रशासन उपाययोजना करत आहे

दिल्लीतील प्रदूषणाची वाढती पातळी पाहता दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय (पीयूसी) पेट्रोल भरताना आता 10 हजार रुपयांचे चलन कापले जात आहे. यासाठी परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर परिवहन विभाग आणि नागरी संरक्षण स्वयंसेवकांची पथके तैनात केली आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह अनेक राज्य सरकारांना फटकारले आहे. यामुळेच एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ने केंद्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि यूपीसह राज्य सरकारांसोबत संयुक्त बैठक घेऊन अनेक निर्बंध लादले आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण