शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उमर खालिद हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 12:32 IST

राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या दोघांची हल्ल्याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. 13 ऑगस्टला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी उमर खालिद हजर राहिला होता. यावेळी उमरवर दोन अज्ञातांकडून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

कॉन्स्टिट्युशन क्लब जवळच्या चहाच्या स्टॉलवर उमर खालिद आपल्या काही साथीदारांसोबत उभा होता. इतक्यात, पांढरा शर्ट घातलेली एक अज्ञात व्यक्ती त्याच्या दिशेनं आला. त्या माणसानं त्याला ढकललं आणि त्याच्यावर गोळी झाडली. पण, खालिदचा तोल गेल्यानं तो खाली पडला आणि थोडक्यात बचावला. यावेळी घटनास्थळी हजर असलेल्यांनी  हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला पण हवेत गोळ्या झाडत तो निसटला. त्यावेळी त्याच्या हातातून पिस्तुलही खाली पडली.  

दरम्यान, उमर खालिदवर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विठ्ठलभाई पटेल रोडवरील सीसीटीव्हीमध्ये धावत असतानाचे हल्लेखोराचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोन जणांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं या दोघांना ताब्यात घेतले. 

हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत या दोघांनी पंजाबमधील एका गावात आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितले होते. मात्र या दोघांनी आत्मसमर्पण केले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. नवीन दलाल आणि दरवेश शाहपूर अशी या दोन युवकांची नावं आहेत. 15 ऑगस्टच्या दिवशी दुपारच्या सुमारास हा व्हिडीओ दोघांनी शेअर केला होता. 

टॅग्स :Crimeगुन्हाUmar Khalidउमर खालिद