शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 175 बांगलादेशी ताब्यात; आता परत पाठवण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 14:39 IST

दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

दिल्ली उपराज्यपालांच्या आदेशानंतर, दिल्लीपोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना दिल्लीबाहेरील जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

संशयित कागदपत्रे - खरे तर, दिल्ली पोलिसांनी नुकतीच दिल्ली बाह्य जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 175 संशयितांची ओळख पटली असून. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासात कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आली. तपासानंतर जे काही तथ्य समोर येतील. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांचं दिल्लीकरांना आवाहन - यापूर्वीही पोलिसांनी शाहदरा आणि दक्षिण पूर्व जिल्ह्यात शोधमोहीम राबवली होती. त्यातही काही संशयित बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली होती. तसेच, आता दिल्लीकरांनी परिसरात कुणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

दिल्लीमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा अनेक दशकांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. दिल्ली एलजींनी पोलिसांना रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसRohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेश