दिल्ली पोलिसांना आढळला जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा मृतदेह
By Admin | Updated: March 10, 2016 13:22 IST2016-03-10T13:17:23+5:302016-03-10T13:22:07+5:30
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांने गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांना हा मृतदेह आढळला

दिल्ली पोलिसांना आढळला जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा मृतदेह
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १० - दक्षिण दिल्लीतील बेर सराई परिसरात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांने गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांना हा मृतदेह आढळला. जेएनयू कॅम्पसच्या बाहेर ही घटना घडली असून विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वैयक्तिक कारणामुळे ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या विद्यार्थ्याची ओळख जाहीर करण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.