शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:01 IST

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता

नवी दिल्ली - देशात नागरिक सुधारणा विधेयकावरुन रणकंदन माजलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये नागरिक आक्रम झाले असून हिंसात्मक घटना घडत आहेत. नागरिक सुधारणा विधेयकाला विरोध करत विद्यार्थ्यांसह, तेथील नागरिकांनी मोठं आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची धग देशभर जाणवत असून दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळत आहे. दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला आहे. त्यावरुन, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिल्ली पोलिस बसला आग लावताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे विनाकारण गाड्यांची तोडफोड पोलिसांकडून होत आहे. भाजपाकडून गलिच्छ राजकारण होत असून दिल्लीत भडकलेल्या हिंसेचा नि:पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही सिसोदिया यांनी केलीय.   

लखनौमधील नदवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीही विधयेकास विरोध करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, पोलिसांनी कॉलेजचे गेटच बाहेरुन बंद केलंय. जामिया येथील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात येत आहे. तसेच, हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटी येथेही विद्यार्थ्यांनी जामिया येथील विद्यार्थ्यांना समर्थन देत आंदोलन सुरू केलं आहे.  जामिया विश्वविद्यालयाजवळ हिंसात्मक घटन घडल्या आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत, पण दिल्लीमध्ये याची सर्वाधिक धग जाणवत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी हिंसा भडकवण्याचं काम केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAmit Shahअमित शहा