दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, १ पोलिसाचा मृत्यू
By Admin | Updated: December 23, 2015 13:14 IST2015-12-23T12:31:06+5:302015-12-23T13:14:43+5:30
दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाच्या आवारात बुधवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत

दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, १ पोलिसाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - राजधानी दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाच्या आवारात बुधवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोर्ट रूम क्रमांक ७३मध्ये एका गँगस्टरची सुनावणी सुरू असताना हा गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये एक पोलिस कॉन्स्टेबल, कोर्टातील कर्मचारी व अन्य एक व्यक्ती जखमी झाली. मात्र उपचारांदरम्यान तीन गोळ्या लागलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.
दोन गँग्जच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.