शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत 'अल-कायदा'च्या दहशतवाद्याला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 18:26 IST

देशाची राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदा या संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

नवी दिल्ली, दि. 18 - देशाची राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदा या संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचे नाव शोमोन हक असे सांगण्यात येत आहे. या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ही कारवाई केली आहे. सेंट्रल दिल्लीतील विकास मार्गावरुन शोमोन हक याला काल रात्री (दि.17) अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षातील अल-कायदा या संघटनेच्या दहशतवाद्याला पकडण्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 

शोमोन हक बिहारमधील किशमगंजजवळ राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्याच्या आयडीवरुन ही माहिती समजते. शोमोन हक गेल्या चार वर्षांपासून अल-कायदा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी अल-कायदा संघटनेने भारतात दहशवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, शोमोन हक 2013 मध्ये अल-कायदाच्या संपर्कात आला होता. त्याने अल-कायदासाठी दक्षिण आफ्रिका आणि सीरियामध्ये काम केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, त्याच्याकडून 4 काडतुसे, लॅपटॉप, फोन आणि बांगलादेशी सिम कार्ड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

शोमोन हक बांगलादेश आणि म्यानमारमध्येही अल-कायदा संघटनेचे काम सुरू केले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा भारताकडे वळवला. म्यानमार मधून पश्चिम बंगाल तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आलेल्या रोहिंग्या मुस्लिम तरुणांना चिथावणी देणे त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेणे यासाठी तो काम करत होता. आपल्या कामात तो काही स्थानिकांची मदत घेत होता, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त पी. कुशवाह यांनी सांगितले.

टॅग्स :TerrorismदहशतवादPoliceपोलिस