शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये दोन प्रवशांचा दारू पिऊन गोंधळ; लँड होताच दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:52 IST

गेल्या काही दिवसात विमानात दारू पिऊन गैरवर्तन केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

पाटणा- विमानात दारू पिऊन गैरवर्तन केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. यातच, दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात दोन प्रवाशांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रवाशांना पाटण्यात उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी दारू प्यायल्याची पुष्टी झाली असून, आजच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इंडिगोच्या व्यवस्थापकाने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-6383 मध्ये या दोन प्रवाशांनी गोंधळ घातला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वीच एअर ट्रॅफिक कंट्रोलला इंडिगोने सांगितले होते की, फ्लाइटमध्ये दोन प्रवासी दारू पिऊन गोंधळ घालत आहेत. या प्रवाशांना चालक दलातील सदस्यांनी दारू पिण्यापासून रोखलेही होते. यानंतर या लोकांनी लेखी माफीही मागितली. पण, लँडिंगनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

यापूर्वी अनेक घटन घडल्याविशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 7 जानेवारीलाच शंकर मिश्राला अटक केली होती. शंकर मिश्रा याच्यावर 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा आरोप आहे. महिलेने तात्काळ या घटनेची तक्रार नोंदवली, पण, अनेक दिवसानंतर 7 जानेवारीला त्या व्यक्तीला अटक झाली. पॅरिसहून दिल्लीला येणा-या फ्लाईटमध्येही असेच एक प्रकरण समोर आले असून, एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. ही घटना डिसेंबर महिन्याची आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने याप्रकरणी एअर इंडियाकडून उत्तर मागितले आहे.

टॅग्स :airplaneविमानdelhiदिल्ली