शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 18:10 IST

Delhi Ordinance 2023: केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत दिल्लीत गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्यासह इतर निर्णय आपल्या हाती घेतले आहेत.

AAP On Delhi Ordinance 2023:केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दिल्लीतीलआप सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्र सरकारचा हा अध्यादेश असंवैधानिक असल्याचे दिल्ली सरकारने शुक्रवारी (30 जून) म्हटले. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आप सरकारने केंद्र सरकारच्या अध्यादेशावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, असे म्हटले आहे.

अध्यादेशाची प्रत जाळणारगेल्या महिन्यात केंद्र सरकारने दिल्लीतील गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी अध्यादेश जारी केला. याला अरविंद केजरीवाल सरकार विरोध करत आहे. आप संपूर्ण दिल्लीत अध्यादेशाच्या प्रती जाळण्याच्या तयारीत आहे. 3 जुलै रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या कार्यालयात केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या प्रती जाळतील. यावेळी आम आदमी पक्षाचे सर्व आमदार, मंत्री, नगरसेवक आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत.

केंद्राने अध्यादेश जारी केला केंद्र सरकारचा अध्यादेश जारी होण्याच्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील पोलीस, कायदा आणि सुव्यवस्थेसह इतर सर्व सेवांचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे सोपवले होते. यानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश जारी करत सर्व अधिकार परत आपल्या हातात घेतले. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करत नसून हा अध्यादेश असंवैधानिक असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

आपला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबाआपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावर समर्थनासाठी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :AAPआपCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल