शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Delhi-Mumbai Expressway केंद्र सरकारची तिजोरी भरणार; वर्षाला हजारो कोटींचा टोल वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:13 IST

Delhi-Mumbai Expressway travel time, benefits: या रस्त्याचे नाव जरी दिल्ली मुंबई असले तरी दिल्लीतून केवळ किमी आणि महाराष्ट्रातून केवळ 171 किमीच हा रस्ता जाणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे (Delhi-Mumbai Expressway) च्या कामाची पाहणी केली. हा एक्स्प्रेसवे सुरु झाला की दर महिन्याला या रस्त्यावरून 1000 ते 1500 कोटी रुपये टोल वसूल केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच वर्षाला केंद्र सरकारच्या तिजोरीत 12000 ते 18000 कोटी रुपये जाणार आहेत. हा एक्स्प्रेसवे 2023 मध्ये सुरु होईल. (Delhi-Mumbai Expressway can collect 12000 crore toll per Year.)

या एक्स्प्रेस हायवेचे फायदे आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा हा एक्स्प्रेसवे प्रवासाचा वेळ निम्म्याने वाचविणार  आहे. 24 तासांऐवजी हा प्रवास 12 तासांचा होणार आहे. हा जगातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे असणार आहे. आठ लेनच्या या एक्स्प्रेस वेची लांबी 1380 किमी असणार आहे. हा रस्ता जवाहर लाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत जाणार आहे. मात्र, सरकार हा रस्ता नरिमन पॉईंटपर्यंत बनविण्याचा विचार करत आहे. 

Nitin Gadkari: पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविलेला; नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट 

महत्वाचे म्हणजे या रस्त्याचे नाव जरी दिल्ली मुंबई असले तरी दिल्लीतून केवळ किमी आणि महाराष्ट्रातून केवळ 171 किमीच हा रस्ता जाणार आहे. गुजरात सर्वाधिक 426, राजस्थान 373 मध्य प्रदेश 244 आणि हरियाणातून 129 किमी एवढा रस्ता जाणार आहे. सध्या दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठी ट्रकने 48 तास आणि कारने 24 ते 26 तास लागतात. एक्स्प्रेस वे बनल्यानंतर हे अंतर कारने 12 ते 13 तासांत आणि ट्रकने 18 ते 20 तासांत कापले जाणार आहे. 

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 98,000 कोटी रुपये आहे. जर वर्षाला 12000 कोटी रुपये महसूल मिळाला तर येत्या 8 वर्षांतच सर्व खर्च वसूल होईल. यामुळे एनएचएआयवरील कर्जाचा भारही कमी होईल. एकूण कर्ज हे मार्चमध्ये 3,06,704 कोटी रुपये होते. गडकरींनुसार पुढील पाच वर्षांनंतर देशाला टोलमधून दरवर्षी 1.40 लाख कोटी रुपये मिळू लागतील. सध्या हे उत्पन्न 40,000 कोटी रपये आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गtollplazaटोलनाका