दिल्लीत अल्पवयीन मुलीला बलात्कार करुन जाळले

By Admin | Updated: March 8, 2016 14:22 IST2016-03-08T14:22:21+5:302016-03-08T14:22:21+5:30

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळल्याची धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे

In Delhi, a minor girl was raped and burned | दिल्लीत अल्पवयीन मुलीला बलात्कार करुन जाळले

दिल्लीत अल्पवयीन मुलीला बलात्कार करुन जाळले

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ८ - १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळल्याची धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे. पिडीत मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिला सफरजंग रुग्णालयामधील आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. 
 
सोमवारी पहाटे २.३० वाजता मुलीच्या पालकांनी घराच्या गच्चीवरुन मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी गच्चीवर धाव घेतली असता त्यांनी मुलीला जळलेल्या अवस्थेत पाहिलं. पिडीत मुलगी ९५ टक्के भाजली आहे. मुलीचा नेहमी पाठलाग करणा-या एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 
 
साक्षीदारांनी सांगितल्याप्रमाणे एका तरुणाने जबरदस्ती घरात प्रवेश केला. बलात्कार केल्यानंतर त्याने मुलीला पेटवून दिलं. आम्ही वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत मात्र मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पिडीत मुलगी दहावीत शिकत होती. मात्र एक तरुण तिचा रोज पाठलाग करत असल्याने गेल्यावर्षी तिचं शाळेतून नाव काढून टाकण्यात आलं होतं. मुलीची शाळा बंद नाही केली तोपर्यंत तरुण रोज त्रास देत होता असं पिडीत मुलीच्या पालकांनी सांगितलं आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिच्यावर उपचार करणं कठीण जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: In Delhi, a minor girl was raped and burned