शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Delhi MCD Election Results 2022: सत्येंद्र जैन यांचं 'जेल मालिश' 'आप'ला भारी पडलं, पाहा त्यांच्या बालेकिल्ल्यात काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:09 IST

दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या वार्डात कुणाची कामगिरी सरस राहिली त्यावर अनेकांची नजर आहे

नवी दिल्ली - दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. आतापर्यंत ७८ हून अधिक जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार जिंकले आहेत. भाजपा ५७, काँग्रेस ४ आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. दिल्ली महापालिकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा चालला असून आप स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येते. 

दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या वार्डात कुणाची कामगिरी सरस राहिली त्यावर अनेकांची नजर आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या वार्डात ४ पैकी ३ भाजपा आणि एका जागेवर आप आघाडीवर आहे. सत्येंद्र जैन ज्यांच्यावर कथित घोटाळ्याचा आरोप झालाय. ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. त्यांच्या वार्डात सर्व ठिकाणी भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांच्या वार्डात ४ पैकी ३ जागांवर आप पिछाडीवर आहे. 

आम आदमी पक्षाला सर्वात मोठा विजय एससी एसटी मंत्री राजकुमार आनंद यांच्या मतदारसंघात मिळाला आहे. त्याठिकाणी चारही जागांवर आपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या मतदारसंघात ४ पैकी २ ठिकाणी आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस, भाजपा उमेदवार विजयाच्या दिशेने आघाडीवर आहेत.कोण आहेत सत्येंद्र जैन? मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन कैद आहेत. सत्येंद्र जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याचा दावा ईडीने केला होता. छाप्यांमध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटी रोख सापडले होते. अन्य सहकारी वैभव जैन यांच्याकडे 41.5 लाख रोख आणि 133 सोन्याची नाणी सापडली आहेत. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडली होती. अलीकडेच सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात एका माणसाकडून मालिश करून घेत असल्याचा व्हिडिओ भाजपाने व्हायरल केला होता. त्यावरून आपची कोंडी करण्यात आली होती.  

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा