शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजारी सासऱ्यांना खायला द्यायचं होतं कासव; जावई गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:09 IST

कासवाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग बरा होतो, असे त्याला कोणीतरी सांगितले होते.

आपल्या सासऱ्यांचा क्षयरोग (टीबी) बरा करण्यासाठी त्यांना कासव खायला देऊ पाहणाऱ्या एका जावयला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. येथील चाणक्यपुरी परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या अमन याने आपल्या सासऱ्यांचा क्षयरोग बरा करण्यासाठी पाच कासवं विकत घेतली होती. कासवाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग बरा होतो, असे त्याला कोणीतरी सांगितले होते. त्यामुळे अमनने एका ठिकाणहून तीन हजार रुपयांना इंडियन सॉफ्टशेल प्रजातीची कासवं विकत घेतली. ही कासवं घेऊन तो कारने आपल्या घरी जात असताना सायमल बोलिवर रस्त्यावर पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, पोलिसांना बघून घाबरलेल्या अमन आणि त्याच्या मित्रांनी नाकाबंदीच्या अलीकडे काही अंतरावर कार सोडून पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीच्या  पुढच्या सीटच्याखाली ठेवलेल्या गोणीत पाच कासवे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी वन्यजीव कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून अमनला शोधायला सुरुवात केली. काही वेळानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर केलेल्या चौकशीत अमनने आपण ही कासवे सासऱ्यांच्या उपचारासाठी आणल्याचे सांगितले. माझ्या सासऱ्यांना टीबी आहे. टीबी बरा होण्यासाठी कासवाचे मांस खातात, असे मी ऐकले होते. त्यामुळेच आपण ही कासवे विकत घेतल्याचे त्याने म्हटले. दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून अमनने यापूर्वीही अशाप्रकारे कासवं विकत आणली होती का, याचा शोध घेत आहेत. ही कासवं दुर्मिळ प्रजातीची असल्याने त्यांना पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली