शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

Arvind Kejrjiwal : 9 समन्सकडे केलं दुर्लक्ष, 10व्याला 'गेम ओव्हर'! ईडीनं इंगा दाखवत केजरीवालांना अशी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 11:03 IST

Delhi liquor scam case money laundering : अरविंद केजरीवाल (Arvind Kejrjiwal) यांच्या घराबाहेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. ईडीची टीम केजरीवाल यांच्या निवासस्थानी होती, तेव्हाच आम आदमी पार्टीच्या लीगल टीमने सर्वोच्च न्यायालयात ई-फाइलिंगच्या माध्यमाने अपील केली. मात्र न्यायालयाने यासंदर्भात तत्काळ सुनवणीस नकार दिला.

दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने अर्थात ईडीने अरविंद केजरिवाल यांना तब्बल 9 वेळा समन पाठवले होते. मात्र केजरीवाल यांनी त्या समन्सकडे दुर्लक्ष केले. यानंतर गुरुवारी ईडीचे अधिकारी 10वे समन घेऊन  मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि जवळपास 2 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. ईडीची टीम केजरीवाल यांच्या निवासस्थानी होती, तेव्हाच आम आदमी पार्टीच्या लीगल टीमने सर्वोच्च न्यायालयात ई-फाइलिंगच्या माध्यमाने अपील केली. मात्र न्यायालयाने यासंदर्भात तत्काळ सुनवणीस नकार दिला. खरे तर अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, अशी शंका आप नेत्या आतिशी यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. 

केजरीवालांना केव्हा-केव्हा पाठवलं गेलं समन - - पहिले 02 नोव्हेंबर, 2023- दुसरे 18 डिसेंबर, 2023- तिसरे 03 जेनेवारी, 2024- चौथे 18 जानेवारी, 2024- पाचवे 02 फेब्रुवारी, 2024- सहावे 19 फेब्रुवारी, 2024- सातवे 26 फेब्रुवारी, 2024- आठवे 04 मार्च 2024- नववे 17 मार्च 2024

...अन् ईडीनं अ‍ॅक्शन घेतली - तत्पूर्वी, 21 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या विरोधातील काही पुरावे सादर केले होते. तसेच, या काही पुराव्यांच्या आधारेच केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत असल्याचे म्हटले होते. याचवेळी, हे पुरावे केजरीवाल यांच्या वकिलाला दाखवू नये, अशी विनंतीही ईडीने न्यायालयाकडे केली होती.

केजरीवाल असे अडकले -मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालयCorruptionभ्रष्टाचार