शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
2
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
3
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
4
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
5
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
6
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
7
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
8
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
9
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
10
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
11
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
13
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
14
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
15
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
16
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
17
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
18
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
19
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
20
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 08:47 IST

Arvind Kejriwal : मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविली.

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविली. तसेच, उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारे अरविंद केजरीवाल यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. या निकालामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. आता अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळावा, यासाठी आप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले जाते.

मंगळवारी अरविंद केजरीवाल यांची मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने केलेली अटक दिल्ली उच्च न्यायालयाने वैध ठरविली. न्यायालयाने अटकेला आव्हान देणारे केजरीवाल यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. अरविंद केजरीवाल यांनी आपचे संयोजक या नात्याने व इतरांसोबत सहभागी होऊन मद्य धोरणाचे कारस्थान रचून लाचेची मागणी केली, असे पुरावे ईडीने सादर केले आहेत. त्यांची ईडीने केलेली अटक अवैध ठरविता येणार नाही, असा निकाल न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दिला.

साक्षीदाराला माफी आणि जामीन देणे ईडीच्या अखत्यारीत येत नसून, ती न्यायिक प्रक्रिया आहे. माफीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करणे, म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करणे ठरेल. माफीचा कायदा शंभर वर्षे जुना आहे, तो काही आत्ता आलेला नाही, असेही न्या. शर्मा यांनी निकालात म्हटले आहे. तसेच, आप ही कंपनी नसून, लोकप्रतिनिधी कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला कंपनीचे नियम कायदे लावून जबाबदार धरता येणार नाही. हा युक्त्तिवाद फेटाळून लावताना अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात पीएमएलएचे कलम ७० लागू होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला हेतुपुरस्सर अटक करण्यात आली, हा अरविंद केजरीवाल यांचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय षडयंत्रदिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाशी आम्ही सहमत नाही. हे प्रकरण मनी लॉड्रिगचे नसून, भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय षडयंत्र आहे. सर्वाधिक मतांनी जिंकणारे केजरीवाल आणि त्यांच्या राजकीय पक्षाला, तसेच दिल्ली आणि पंजाबमधील दोन सरकारांना तुडवण्यासाठीचे हे षडयंत्र आहे. खोटे पुरावे आणि साक्षींवर आधारलेले हे प्रकरण आहे, असा आरोप मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला.

केजरीवालांच्या अटकेचा आजचा २१ वा दिवसदरम्यान, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले, त्यावरही न्यायालयाने फटकारले आहे. निवडणुका असल्यामुळे अटकेला आव्हान दिले जाऊ शकत नाही. अटकेची वेळ तपास यंत्रणा ठरवतात असे न्यायालयाने सांगितले. ईडीने २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. केजरीवालांच्या अटकेचा आजता २१ वा दिवस आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय